Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

Admin by Admin
November 6, 2024
in राजकीय
0
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कोल्हापूर-: राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
महायुतीची संयुक्त सभा आज कोल्हापूरातून होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे.
आजची सभा खूप ऐतिहासिक आहे, 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली. त्यानुसार, लाडक्या बहिणींना (Ladki bain yojana) 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली, तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
कोल्हापूरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वीच जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यामध्ये, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले, आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेला आहे. कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही. आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हणून. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा –
1) लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

Previous Post

अन्नछत्र मंडळात आमदार सचिन कल्याणशेट्टीच्यां वाढदिवसानिमित्त सत्कार

Next Post

प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Admin

Admin

Next Post
प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रा डॉ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आसू येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697