महाराष्ट्र

लोक नेतृत्व काळाच्या पडद्याआड , सुनिलदादा बंडगर यांचे दुःखद निधन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मैंदर्गीचे सुपुत्र .सुनिल दादा बंडगर यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. बहुजन समाज व धनगर समाजाला राजकीय दिशा देणारे लोक नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनिलदादा बंडगर यांनी रासपकडून अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढवली होती. एक लोक नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ठिक 2.00 वा मैंदर्गी येथे हिंदू स्मशानभूमीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button