सामाजिक

अक्कलकोटचे बस स्थानक की चिखलाचे आगार ! 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले असून अक्कलकोट बस स्थानक की चिखलाचे आगार म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
 अक्कलकोटसाठी नवीन बस स्थानकाचे बांधकाम सध्या सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात जुन्या बस स्थानकाच्या बाजूला पत्र्याचे शेड मारून बस स्थानक उभे करण्यात आले आहे. पण सदरचे बस स्थानक हे प्रवाशांसाठी असून अडचण नसून खोळंबा  याप्रमाणे गैरसोयीचे ठरले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या तात्पुरत्या बस स्थानक परिसराची अवस्था ही दयनीय झाली आहे .पावसामुळे बस स्थानकाच्या परिसरात सर्वत्र चिखलच चिखल झाले आहे. या चिखलातून रस्ता काढणे प्रवाशांना विशेषता वयोवृद्धांना महिलांना शालेय विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. बस स्थानकात सर्वत्र चिखलच झाल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. हजारो प्रवासी ज्या ठिकाणी  ये जा करतात त्या ठिकाणी ची अवस्था ही अतिशय दयनीय झाल्याने परगावच्या भाविकातूनही संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या बस स्थानक परिसरात चिखल होऊ नये म्हणून सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे.
oplus_0
अक्कलकोटच्या बस आगार प्रमुखांनी याबाबत पाठपुरावा करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावे अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोटच्या लोकप्रतिनिधींनी एकदा बस स्थानकाची अवस्था बघून संबंधित विभागाला बस स्थानक परिसरात सुविधा देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी हजारो प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button