सोलापूर

कारगिल युद्धाची पंचविशी सोलापूर येथे मोठ्या उत्साहाने साजरी

 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे
यश सिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर 
 यांच्यावतीने कारगिल विजय दिवस मानवंदना कार्यक्रम ” साजरा करण्यात आला.
या औचित्याने 1971 चे युद्ध, कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पवन आणि 26/ 11 चा हल्ला यामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सन्मान सन्मान करण्यात आला . 
 या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस  उपायुक्त सोलापूर  पोलीस आयुक्तालय  -अशोक तोरडमल ,सहाय्यक  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी- एस.व्ही.पवार,फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे  पी.आय.  विकास देशमुख ( गुन्हे )   सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे  मिलिंद भिंगारे, कॅप्टन कमलाकर कांबळे  यांची होते .
-प्रथम तिरंगा राष्ट्रध्वजास पुष्पमाला  अर्पण करून 
-सोलापूरचे चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुष्प माला  अर्पण करून अभिवादन करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर शहिदांना मान्यवर आणि उपस्थित सैनिकांच्या  वतीने पुष्पचक्र अर्पण. करून कारगिल युद्धामध्ये सामील असलेल्या युद्ध वीरांना सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाची प्रस्तावना- उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे   यांनी केले .  प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे यांनी कविता सैनिका बद्दल  सादर केली.   सुरेखा माणिक ख्याले   यांनी  नागरिकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षिका छाया फाळके यांनी सैनिकांना समर्पित  कविता सादर केली.  माजी सैनिक उदय शिंदे यांनी सुद्धा देशभक्तीपर गीत सादर केले.समता सैनिक दलाचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी सहाय्यक पोलीस उपयुक्त अशोक तोरडकर  यांचा सत्कार कॅप्टन कमलाकर कांबळे यांनी केला, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पवार  यांचा सत्कार माजी सैनिक जयानांद कांबळे यांनी केला ,फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख (गुन्हे )यांचा सत्कार माजी सैनिक सूर्यकांत गजघाटे यांनी केला ,सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय मिलिंद भिंगारे  यांचा सत्कार प्रकाश घटकांबळे यांनी केला. याप्रसंगी 1971चे
 भारत-पाकिस्थान युद्ध, कारगिल युद्ध ,ऑपरेशन पवन, ऑपरेशन विजय यामध्ये सहभागी असलेल्या माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी सैनिक रामचंद्र शंकर माशाळे, लिंबाजी कांबळे, मनोहर माशाळकर, इराणा धनशेट्टी ,महाबोले ज्ञानेश्वर भीमराव, आप्पासाहेब रामकृष्ण पुजारी, रविकुमार जेटप्पा कुरणे,  दिलावर शेख, प्रमोद जाधव, अरुण ढावरे,  श्रीमंत ओव्हाळ  यांना सन्मानित करण्यात आले. शेवटी आभार – हवालदार  शिवपुत्र घटकांबळे  ( सेवानिवृत्त) उपाध्यक्ष यश सिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र राज्य. यांनी मानले. या कार्यक्रमाची
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगत झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक सूर्यकांत गजघाटे माजी सैनिक प्रमोद जाधव माजी सैनिक प्रकाश घटकांबळे माजी सैनिक जयानंद कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले .या कार्यक्रमास भारतीय थलसेना, जल सेना, वायुसेना,सीमा सुरक्षा दल, व इतर पॅरामिलिटरी फोर्सचे जवान नागरिक, महिला , पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्राध्यापिका अंजना गायकवाड यांनी केले .

     

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button