महाविकास आघाडीच्या वतीने रस्ते कामातील भ्रष्टाचाराबाबत हलगीनाद आंदोलन

अक्कलकोट:-(प्रतिनिधी):-
अक्कलकोट तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट बनले आहेत व बनत आहेत. त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असुन त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावे या मागणीसाठी गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कार्यालयासमोर व पंचायत समिती समोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्याला लेखी निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नवीन रस्त्यांची कामे निकृष्ट व सुमार दर्जाचे झाले आहेत. या कामात भ्रष्टाचाराचे स्तोम माजलय तो तात्काळ संपवा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानूरे यांनी प्रशासनासमोर हलगीनाद आंदोलन करून देण्यात आला.
येथील पंचायत समिती व बांधकाम कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले.महाविकास आघाडी अक्कलकोटच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शिवसेना ठाकरे गट ता. प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी शरद पवार गट ता. अध्यक्ष बंदेनवाज कोरबु यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानूरे यांनी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत तालुक्यात पीडब्ल्यूडी, व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाचे रस्त्याची कसून चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. असे बुक्कानुरे म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अश्पाक बळोरगी, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवसेना ठाकरे गटचे जि. उपाध्यक्ष सुनिल कटारे, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला, रामचंद्र समाणे, श्रीशैल धनशेट्टी, शिवानंद बिराजदार, अरूण जाधव, मैनुद्दीन कोरबु, शरण सुरवसे, महातेंश हत्तुरे, बाबन जमादार, मुबारक कोरबु, अलिबाशा अत्तार, मल्लू अरवतकल, बसवराज पुजारी, नितीन मोरे, श्रीशैल स्वामी, मोहसीन मोकाशी, स्वामिनाथ कलकोटे, कुमार गद्दी, विक्रम पवार, जब्बार बागवान, गणेश मोरे, महादेव बिराजदार, महंमद पठाण, भीमा भासगी, संतोष रत्नाकर, सातवीरप्पा कळसगोंडा, मल्लू कल्याण, संतोष पाटील, राहुल भकरेसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



