Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत केस मुंडन आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; अधिकारी दखल घेईनात !

Admin by Admin
September 25, 2024
in सोलापूर
0
सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत केस मुंडन आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; अधिकारी दखल घेईनात !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर (प्रतिनिधी )
सामाजिक वनीकरण विभागाच्या सोलापूर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत लहुजी शक्ती सेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन सोलापुरात सुरू आहे. सोलापूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या मुख्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. आज पुनम गेट समोर संघटनेच्या वतीने सामूहिक केस मुंडन आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या या आंदोलनाची सोलापूर शहर परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. 
गेल्या दोन दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने संघटनेकडून होत असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सन २०१७  ते २०२३ या आर्थिक वर्षात सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवड, गट लागवड, एनटीपीसी, रस्ता दुतर्फा आदी शासकीय योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकार्यांकडून निवेदनातून करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यात देखील विविध योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. त्या संदर्भात गतवर्षी चौकशी समितीने केवळ रस्ता दुतर्फाची चौकशी करून एका वनपालाला जबाबदार धरले. मात्र संबंधीत वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या कार्यकाळातील कामाची कोणतीच चौकशी झाली नाही. अक्कलकोट तालुक्यातील चार एनटीपीसीची तपासणी, स्थळ पाहणी, अनुदान, त्यावर झालेला सविस्तर खर्च याचा कोणताच अहवाल चौकशी समितीने सादर केलेला नाही. तो सर्व अहवाल मिळावा यासाठी संघटनेकडून तीव्र स्वरूपात विविध प्रकारची आंदोलने पूनम गेट समोर सुरू आहे. उद्या संघटनेकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चौकट:-
२०१७ ते २०२३ ह्या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यासह इतर दहा तालुक्यातील एनटीपीसी, गट लागवड, वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा यासाठी मिळालेला निधी, त्यावर झालेला सविसर खर्च संबंधीत वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या कामाची फेर चौकशीची मागणी केलेली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लवकरच पुणे येथील वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभागाच्या मुख्यालयासमोर हलगीनाद, ढोलनाद, चंगळनाद, पोतराज नाच आदी माध्यमातून संविधानिकरित्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहोत. (वसंत निवृत्ती देडे,जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना सोलापूर).

Previous Post

चपळगाव येथे माजी मंत्री..सिद्धाराम म्हेत्रे  यांचे भव्य सत्काराचे आयोजन

Next Post

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहल गांधी

Admin

Admin

Next Post
आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहल गांधी

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697