Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धनगर समाजाचा अक्कलकोटला चक्का जाम आंदोलन

Admin by Admin
September 24, 2024
in सामाजिक
0
धनगर समाजाचा अक्कलकोटला चक्का जाम आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी : )-    सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी अक्कलकोट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांच्या वतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेञे, सुनील बंडगर,अविनाश मडिखांबे, रमेश पाटील, आनंद तानवडे,बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानुरे, सुनिल कटारे, मल्लिनाथ पाटील, अशपाक बळोरगी, महेश जानकर, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, अनिल बर्वे, दत्तात्रय हिळ्ळी, सुभाष पुजारी,दत्तात्रय माडकर, सुर्यकांत बाचके, गुणवंत लवटे, महादेव करमल, विठ्ठल खताळ,दाजी कोळेकर, संतोष शिंदे, शिवयोगी पुजारी, विश्वनाथ बंदिछोडे, महादेव निंबाळ, रेवणसिध्द शेरी, रवी सलगरे, औदुंबर बंडगर, सैदप्पा इंगळे, अजय मुकणार, प्रकाश गडगडे, विजय पोतेनवरु यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रास्ता रोको आंदोलनास माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेञे, रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष शिलामणी बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, युवा नेते रमेश पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीने पाठींब्याचे लेखी पञ दिले.
रास्ता रोको आंदोलनावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेञे म्हणाले की आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट मिटींगमध्ये धनगर समाजाचा एस. टी. आरक्षणाची प्रश्न सोडवू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. पण आजतागायत दहा वर्षे झाली पण आश्वासन पुर्ण केले नाही. तरी धनगर समाज बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर म्हणाले की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज बांधव निर्णायक भुमिका घेईल. यापुढे धनगर समाज बांधवांनी फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराला मते देऊन आपलेच उमेदवार निवडून आणावे असे आवाहन केले. तर रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी बोलताना म्हणाले की धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत अनेकवेळा लेखी पाठिंबा दिला आहे. सरकारने धनगर समाजास तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, मनसेचे तालुका प्रमुख मल्लिनाथ पाटील, अनिल बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनामुळे नागरीकांची थोडी गैरसोय झाली. जवळपास एक तास भर चक्का जाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पडला. यावेळी सदर रास्ता रोको आंदोलनावेळी सुञसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले.

Previous Post

गणपती विसर्जन प्रसंगी २८ तासात तब्बल ३०० नागरीकांच्या माेबाईलवर चाेरट्यांनी मारला डल्ला

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पारंपारिक  लढतीचीच शक्यता !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पारंपारिक  लढतीचीच शक्यता !

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पारंपारिक  लढतीचीच शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697