प्राचार्य शंकर व्हनमाने मित्र परिवाराकडून पत्रकार गायकवाड व जगताप यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार स्वामीराव गायकवाड तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राजेश जगताप यांचा एच जी प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नागणसूरचे प्राचार्य शंकर व्हनमाने व मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्राध्यापक प्रकाश सुरवसे ,माणिक बिराजदार फरीद जमादार , सामाजिक कार्यकर्ते सुनिल कटारे, निरंजन माने आदीची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवराच्यां हस्ते पत्रकार स्वामीराव गायकवाड , राजेश जगताप यांचा फेटा बांधून , शाल, पुष्पहार , गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक प्रकाश सुरवसे व प्राचार्य शंकर व्हनमाने यांनी स्वामीराव गायकवाड व राजेश जगताप यांना शुभेच्छा दिल्या.