शैक्षणिक

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शाळा,आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगाव सोलापूर येथे सकाळी ११ वाजता होणार असल्याचे संयोजक बापूसाहेब आडसुळ सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये १०० पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे ,माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव व्हनकडे, तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button