पाकणी गावभेट दौर्यात महादेव कोगनुरे यांनी घेतली नादुरुस्त ओढ्याची दखल

ग्रामस्थांनी केले महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
सोलापूर ( प्रतिनिधी )दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी गाव भेट दौरा करीत सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसून येत आहेत.आज याच गाव भेट दौर्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील जुना पाकणी सोलापूर रस्त्यावरील शिंदे वस्ती जवळ सिना नदीकडे जाणारा ओढा नादुरुस्त झाल्याने सामान्य नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओढ्याबाबत समस्या मांडली होती,तेव्हा महादेव कोगनुरे आणि एम के फाउंडेशन चे पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत तेथील समस्या जाणून घेतल्या.कारण या नादुरुस्त ओढ्या मुळे शाळकरी विद्यार्थी,महिला ,वयोवृद्ध नागरिक ,व्यापारी,नोकरदार तसेच वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.यावेळी महादेव कोगनुरे यांनी नादुरुस्त ओढ्या बाबत संबंधित विभागाशी संपर्क साधत पाकणी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.तसेच पाकणी गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत चर्चा केली.तेव्हा पाकणी गावतील ग्रामस्थांनी महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी बाबुराव खलीपे, शिवाजी अडके तसेच काॅग्रेस व एम के फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.