Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ई-पीक पाहणी ही अट रद्द करून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी ५ हजारीची मदत द्या कोलंबी येथील शेतकऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

Admin by Admin
August 13, 2024
in महाराष्ट्र
0
ई-पीक पाहणी ही अट रद्द करून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी ५ हजारीची मदत द्या कोलंबी येथील शेतकऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव (: – सय्यद अजिम नरसीकर )मागच्या हंगामात ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५ हजार अर्थसहाय्य देण्याची घोषणा म्हणजे ई पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने असा दुजा भाव न करता सरसकट शेतकऱ्यांना जाहीर केलेले अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते प्रा. रवींद्र चव्हाण व कोलंबी येथील असंख्य शेतकरी यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार नायगाव यांचेकडे केली आहे.
राज्य शासनाने सन २०२३ च्या खरिप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजाराचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सरकारने याबाबत दि. २९ जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच शासनाने जाहीर केलेले अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे ई पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी तालुक्यातील कोलंबी येथील असंख्य शेतकरी काँग्रेसचे युवा नेते प्रा. रवींद्र चव्हाण यांच्याकडे हा विषय घेवून आले.
शेतकऱ्यांनी शासन निर्णय चुकीचा असून सर्वच शेतकऱ्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी मोबाईल अँपवरुन ई पिक पाहणी केली नसल्याने त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद झाली नाही. अशा शेतकऱ्यांना दि. २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयचा फायदा मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाचा निर्णय हा ई पिक पाहणी न केलेल्या आणि गोरगरीब शेतऱ्यावर अन्याय करणारा असल्याने प्रा. रवींद्र चव्हाण यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेवून सोमवारी सकाळी थेट तहसील कार्यालय गाठले व ई पिक पाहणी केलेल्याच शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले.
शासनाने चुकीचा शासन निर्णय काढून राज्यातील शेतकऱ्यात दुजाभाव निर्माण केला असल्याने ई पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे शासनाने दि. २९ जुलै रोजी काढलेला चुकीचा व शेतकऱ्यात दुजाभाव निर्माण करणारा शासन निर्णय रद्द करावा आणि २०२३ च्या खरिप हंगमातील कापूस व सोयाबीन उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी ५ हजाराचे अर्थसहाय्य द्यावे अन्यथा नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल असा इशाराही प्रा. चव्हाण यांनी दिला.

शेतऱ्यासाठी अतिशय महत्वाच्या विषयावर आमदारासह शेतकऱ्यांचा पुळका दाखवणाऱ्या एकाही नेत्यांनी तोंड उघडले नाही. परंतु प्रा. रवींद्र चव्हाण यांनी याबाबत तातडीने दखल तर घेतलीच पण अर्थसहाय्याच्या बाबतीत आक्रमक भुमिका घेतल्याने उपस्थित कोलंबी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

रिक्षा चालकाची मुलगी झाली पीएसआय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण

Next Post

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास 90 देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ निवडणुक लढविणार गोविंद हानवटे

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697