रिक्षा चालकाची मुलगी झाली पीएसआय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण

मंठा /जालना ( राम राठोड )
मंठा तालुक्यातील माहोरा या छोट्याशा गावातील मुलगी श्रद्धा भारत राठोड यांची नुकतीच पी. _एस.आय._ पदी निवड झाली माहोरा या छोटासा गावात उपजीविकेचे साधन नसल्यामुळे श्रद्धा हिचे वडील पुणे येथे आपलं पोट भरण्यासाठी गेले व पुण्यात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करण्याचे ठरवले परंतु आपल्या मुलीच्या शिक्षणात आपल्या परिस्थितीमुळे कोणत्याच प्रकारचे अडथळा येऊ दिले नाही व मुलीच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले खरंच आपलं बाप आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत करत आहे वडीलाचे व कुटुंबाची परिस्थिती मला बदलायची आहे हा निर्णय मनात करून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून हालाखीच्या परिस्थितीतून श्रद्धांने हे यस संपादन केले यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून शुभेच्छा येत आहेत माहोरा गावात आनंदाचा वातावरण आहे.