राजकीय
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, हराळवाडी, कोरवली गावभेट दौरा

सोलापूर ( प्रतिनिधी )लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी, व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द हराळवाडी कोरवली या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणिती शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.