श्रीरंगं कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सोलापूर जिल्हा शिवसेना प्रणित कामगार सेना यांच्या वतीने. डी एस के महानगरपालिका प्राथमिक शाळा विजयनगर येथे श्रीरंगं कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष सायबाण्णा तेगेंळी होते . यावेळी अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर माहिती अधिकार अक्कलकोट सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनळी अक्कलकोट कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद , मनोज ना. एकमल्ले , प्रतिभा म. एकमल्ले , अविष्कार गायकवाड,, जगदेवी शर्मा, नितीन होळेकर, शुभांगी गायकवाड, अर्चना पवार आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी केला. श्रीरंग कांबळे यांच्या वाढदवसानिमित्त सत्कार करण्यात आला.