राजकीय
शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा हैद्रा येथे सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सोलापूर जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील हजरत खाजा सैफुलमुल्क चिस्ती दर्गा येथे दर्शन घेतले. यावेळी दर्गाह कमिटीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दर्गा कमिटीचे चेअरमन रफिक मुजावर यांच्या हस्ते फेटा बांधून शाल देऊन संतोष पाटील व जिल्हा उपप्रमुख घोडके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संतोष पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल असे सांगितले. या प्रसंगी शिवसेना अक्कलकोट शहराचे माजी प्रमुख रवी डोके , माजी तालुकाप्रमुख मनोज पवार, माजी शहर प्रमुख स्वामीराव मोरे , माजी तालुका उपप्रमुख फैयाज जमादार , माजी शहर उपप्रमुख श्रीशैल पाटील आदी उपस्थित होते.



