Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान 

Admin by Admin
December 2, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६४.२५ टक्के  इतके मतदान झाले.यावेळी नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या सहा उमेदवारांचे तसेच नगरसेवक पदासाठी उभारलेल्या ७६ उमेदवारांचे भवितव्य  मतदान यंत्रात बंद झाले. 
अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी एकूण ३८ हजार ४४२ मतदारांपैकी २४ हजार ७०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी १२ हजार ३५७ पुरुष मतदारांनी तसेच १२ हजार ३३९ महिला मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला. अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत एकूण ४४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली .अक्कलकोट नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर २५ नगरसेवक पदाच्या जागेसाठी ७६ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते .यावेळी अक्कलकोट शहरात मतदानासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मोठ्यात चुरशीने सर्वच मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारानी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. भाजपा , शिवसेना तसेच काँग्रेस सह इतर पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी वाहनांची सोय केली होती.अक्कलकोट शहरातील श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशालेत आदर्श गुलाबी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेंजयराजे भोसले यांनी श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशालेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , काँग्रेस पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशपाक बळोरगी , शिवसेना शिंदे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रईस  टिनवाला यांच्यासह सर्वच उमेदवाराने आपला मतदानाचा हक्क बजाविला.कारंजा चौकातील उर्दू शाळेमध्ये सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. यामुळे मतदारांची मोठी गोची झाल्याचे दिसत होते.पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावर यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी अक्कलकोट शहरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमाकांत डाके हे काम पाहत आहेत.अक्कलकोट  परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या चुरशीने ६४.२५ टक्के  इतके मतदान झाले आहे.काही ठिकाणी मतदारानी क्रॉस वोटिंग केल्याने याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा अक्कलकोट शहरात रंगली होती.या निवडणुकीचा निकाल हा दिनांक २१ डिसेंबर रोजी लागणार असून या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post

दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ७०.९७ टक्के मतदान 

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोस्टरचे अनावरण

Admin

Admin

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोस्टरचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोस्टरचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697