सामाजिक

अक्कलकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा , कृषीमंत्र्यांकडे विकीबाबा चौधरीचीं मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यामध्ये पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा अशी मागणी विकी बाबा चौधरी प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी रोजगार आघाडी यांनी कृषीमंत्री मा. दत्तात्रय  भरणे यांची भेट घेऊन केली आहे. 
​: अक्कलकोट तालुक्यात पावसाने दिलेली ओढ, विहिरी व कूपनलिकांच्या खालावलेल्या पाणीपातळी आणि त्यामुळे हातातून गेलेली पिके याकडे कृषीमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
​दुष्काळ जाहीर करण्याची मागणी: केवळ कागदोपत्री आकडेवारीवर न ठरवता प्रत्यक्ष शेतातील नुकसानीचा विचार करून अक्कलकोट तालुक्याला तातडीने ‘कोरडा दुष्काळग्रस्त तालुका’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
​शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज: पीकविमा भरपाई त्वरीत मिळणे, शेतसारा व वीज बिल माफी, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या/छावणी अनुदान सुरू करण्याची विनंती करण्यात आली.
​कृषीमंत्र्यांचे आश्वासन: कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी अक्कलकोट तालुक्यातील कृषी विभागाकडून तातडीने पीक पाहणी व नुकसानीचा सविस्तर अहवाल (पंचनामे) मागवून घेण्याचे आदेश दिले असून, शासनाकडून योग्य ती मदत व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले अशी माहिती विकीबाबा चौधरी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button