Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा येथे विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन

Admin by Admin
November 1, 2025
in सोलापूर
0
करमाळा येथे विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( प्रतिनिधी ) फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूचा योग्य पद्धतीने तपास होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. या मागणीसाठी करमाळा येथे आज रोजी विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या १) फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास यंत्रणेमार्फत म्हणजेच एसआयटी मार्फत करण्यात यावी, २) सरकारने प्रशासन अथवा राजकीय क्षेत्रातील दोषींना पाठीशी घालू नये, ३) महिला डॉक्टर मृत्यूचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, ४) मृत महिला डॉक्टरच्या व कायमच पीडित महिलांविरोधात बोलणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पदावरून ताबडतोब हटवण्यात यावे. वरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आला.
याप्रसंगी ऍड.सविता शिंदे, डॉ. अमोल दुरंदे, अमरजीत साळुंखे, हनुमंत मांढरे, सुधाकर लावंड, साहेबराव वाघमारे, राजाभाऊ कदम, यशपाल कांबळे, उत्तरेश्वर कांबळे, पद्मजा इंगवले, विजयमाला चवरे, प्रा. गोवर्धन चवरे, दादा ढेरे, दादासाहेब लबडे, अंगद देवकते, चंद्रकांत साळवे, प्रमोद कुंभार, शहाजी धेंडे, ऍड. अलीम पठाण, डॉ. राम बिनवडे, डॉ. बालाजी खटके, डॉ. संतोष आटोळे, डॉ. वर्षा करंजकर, औदुंबर मोरे, रामकृष्ण नायकोडे, एड. योगेश शिंपी, एड. अंकिता वेदपाठक, स्वाती सपकाळ, देवराव सुकळे, एलिझाबेथ असादे इत्यादी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलकांतर्फे नायब तहसीलदार  काझी यांनी निवेदन स्वीकारले.

Previous Post

करमाळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यश कलेक्शनचे मालक सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Next Post

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख सरदार वल्लभभाई पटेल 

Admin

Admin

Next Post
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख सरदार वल्लभभाई पटेल 

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख सरदार वल्लभभाई पटेल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697