Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; ‘या’ तारखेचा ठरला मुहूर्त

Admin by Admin
September 21, 2025
in सोलापूर
0
मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; ‘या’ तारखेचा ठरला मुहूर्त

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर -बहुप्रतीक्षित अशा सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन प्रवासी विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. ही सेवा स्टार एअर कंपनी मार्फत सुरू होणार असून, या संदर्भातील माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

होटगी रोड विमानतळावरून सुरू होणार उड्डाणे

होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून या विमानसेवा सुरू होणार आहेत. यामुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी जलद गतीने थेट संपर्क साधता येणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच भाविक वर्गासाठी ही सेवा अत्यंत सोयीस्कर ठरणार असल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

तिकीट बुकिंग सुरू -दोन्ही विमानसेवांसाठीचे तिकीट बुकिंग आज शनिवार, २० सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. प्रवाशांना नियोजित वेळेनुसार या उड्डाणांचा लाभ घेता येईल.

सोलापूर ते गोवा सेवेनंतर आता दुहेरी सेवा -यापूर्वी ८ जून रोजी सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली असून, ही सेवा आठवड्यातून चार दिवस उपलब्ध आहे. लवकरच ती सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याची तयारी फ्लाय-९१ कंपनीने केली आहे. यानंतर आता मुंबई आणि बंगळुरूसाठीच्या सेवांची भर पडत असल्याने सोलापूरकरांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर केले. त्यामुळे ही सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे सरकारकडून खासगी कंपन्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य आहे. सार्वजनिक सेवा किंवा पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या प्रकल्पांत सुरुवातीला तोटा होण्याची शक्यता असते. अशा वेळी सरकार कंपन्यांना आर्थिक मदत करते. प्रवाशांची सर्व तिकिटे विकली गेली नाहीत तर त्याची भरपाई राज्य सरकार करते.

उड्डाणांचे वेळापत्रक -सोलापूर-मुंबई : प्रस्थान – दुपारी १२:५५ वा.

मुंबई-सोलापूर : प्रस्थान – दुपारी २:४५ वा.

बंगळुरू-सोलापूर : प्रस्थान – सकाळी ११:१० वा.

सोलापूर-बंगळुरू : प्रस्थान – दुपारी ४:१५ वा.

या नव्या हवाई सेवेमुळे सोलापूरकरांच्या प्रवासाच्या सोयींमध्ये मोठी भर पडणार असून, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही नवे दालन उघडणार आहे.

Previous Post

भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय – खासदार धैर्यशील मोहिते पाटील 

Next Post

माझ्या शेतकरी भावा…

Admin

Admin

Next Post
माझ्या शेतकरी भावा…

माझ्या शेतकरी भावा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697