Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय – खासदार धैर्यशील मोहिते पाटील 

Admin by Admin
September 21, 2025
in सामाजिक
0
भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय – खासदार धैर्यशील मोहिते पाटील 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
                   येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने
 श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील, कन्याराज इंदिरा मोहिते-पाटील, आई उर्मिलादेवी मोहिते-पाटील कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी 
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील बोलत होते. पुढे बोलताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी देवस्थानच्या नियोजीत मुरलीधर मंदिर येथील बांधकाम प्रगती पथावर आहे. दर्शन रांगेच्या माध्यमातून सर्व स्वामीभक्तांना लवकरच स्वामी समर्थांचे सुलभरीत्या दर्शन घेता येईल. यासह देवस्थानचे आध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेता नागरिकांच्या व भाविकांच्या सेवेत श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचं मनोगतही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रथमेश इंगळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  मल्लिकार्जुन पाटील, मल्लिनाथ करपे, अरूण जाधव, प्रविण देशमुख, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, श्रीपाद सरदेशमुख, श्रीकांत मलवे, धनराज स्वामी, प्रसाद सोनार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
Previous Post

अन्नछत्र मंडळात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलता देखाव्याचे सोमवारी  उद्घाटन 

Next Post

मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; ‘या’ तारखेचा ठरला मुहूर्त

Admin

Admin

Next Post
मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; ‘या’ तारखेचा ठरला मुहूर्त

मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; 'या' तारखेचा ठरला मुहूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697