Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, माय-बाप शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू : खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
September 13, 2025
in सोलापूर
0
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, माय-बाप शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू : खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार प्रणितीताई शिंदे यांचा अतिवृष्टी भागात पाहणी दौरा…

शेतकऱ्याचे अंत पाहू नये सरसकट पंचनामे करा व नुकसान भरपाई द्या.

मोहोळ / सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले. असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली. तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाने शेतकऱ्याचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी  जिल्हाधिकारी, . प्रांत अधिकारी, .तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह  जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, अरुण पाटील उपस्थित होते.

यावेळी खालील बाधित शेतकरी कृष्णा यादव, सुजाता धावणे, संतोष यादव, हनुमंत धावणे, नानासाहेब राऊत, सुरज यादव, युवराज यादव, विवेकराज धावणे, शिवम धावणे, विष्णू यादव, महेश यादव, स्वाती धावणे, चंद्राहार धुमाळ, तानाजी धावणे, सत्यवान धावणे, आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी बंडू थिटे, दिलीप धावणे, अरुण पाटील, तानाजी शिंदे, दीपक शिरसाट, दिनकर पोटरे, वसंत चव्हाण, लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शेतकरी नेते मा. आ. बच्चूभाऊ कडू यांची शेतकरी – शेतमजूर मेंढपाळ हक्क सभा

Next Post

परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया – उपसरपंच फारूक शेख 

Admin

Admin

Next Post
परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया – उपसरपंच फारूक शेख 

परंडा तालुक्यातील  लंपी आजाराने जनावरे मरण झाल्याने त्यांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दया - उपसरपंच फारूक शेख 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697