Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

Admin by Admin
July 27, 2025
in टॉप न्यूज
0
आमदार सचिनदादानां  मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची सर्वत्र चर्चा सुरू असून मंत्रिमंडळ फेरबदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ८ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. जवळपास ८ मंत्र्यांना बदलण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले आहेत. विकासासाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे वजनदार युवा नेते म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहण्यात येते. भाजपासाठी आश्वासक चेहरा म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ओळख राज्याच्या राजकारणात झाली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर असलेली मजबूत पकड ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध , जनतेचे लाभलेले मोठे पाठबळ , विकास कामांसाठी निधी आणणारा आमदार , कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता अशी वेगळी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने वर्चस्व राखले आहे. यामुळे सोलापूर जिल्हासह राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निर्माण केल्याने त्यांना आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळणार मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे. राज्यातील आठ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सत्ताधारी सरकारकडून सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपाचे आमदार अधिक असतानाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. आता मंत्रिमंडळ फेरबदला तरी स्थान मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे जिव्हाळ्याचे संबंध पाहता आमदार कल्याणशेट्टी  यांना मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळण्याची आशा दुणावली आहे. याबाबत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात व जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous Post

डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने सत्कार

Next Post

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांची भेट

Admin

Admin

Next Post
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांची भेट

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697