Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हिंदी सक्तीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार

Admin by Admin
June 27, 2025
in महाराष्ट्र
0
हिंदी सक्तीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट, संजय राऊतांची घोषणा
मुंबई – हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे होणार होता. ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे
मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणूक रिंगणात उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अद्याप चर्चेच्याही पातळीवर पोहोचली नसली तरी हिंदी सक्तीच्या विरोधात पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्‍या सर्वपक्षीय मोर्चात हे बंधू एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघावा, अशी भूमिका घेत उद्धव आणि त्यांच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याचे राज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
सामानाच्या पहिल्याच पानावर आज  उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून “राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला” अशी बातमी सामनाने आज छापली आहे. सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे. हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनाने आज छापली आहे.
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. ३० जून ते ९ जुलै २०२५ पर्यंत आयोजन

Next Post

छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात साजरी

Admin

Admin

Next Post
छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात साजरी

छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697