Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सरपंच वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय प्रभात नारी पुरस्कार प्रदान

Admin by Admin
April 1, 2025
in महाराष्ट्र
0
सरपंच वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय प्रभात नारी पुरस्कार प्रदान
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पदमश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सरपंच सुरवसे यांचा सुपरवूमन म्हणून गौरव 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत, स्वत:पुरते मर्यादित न राहता समाजासाठी कार्य करणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेल्‍या कर्तृत्‍ववान महिलांचा हृद्य सन्‍मान सोहळा सोमवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. वास्‍तवाशी भिडणाऱ्या कर्तृत्‍ववान तेजस्विनींच्‍या कार्याने सर्व सभागृह रोमांचित झाले. दैनिक प्रभातचा चौथा नारी सन्‍मान २०२५ हा सोहळा मोठ्या दिमाखात, थाटात आणि उत्‍साहात संपन्न झाला.
दै. प्रभातच्‍या नारी सन्‍मान पुरस्‍कार वितरण सोहळ्याप्रसंगी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, नगरविकास आणि सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री माधुरी मिसाळ, दैनिक प्रभातच्‍या संचालिका वृषाली गांधी यांच्या हस्ते गोगावच्या सरपंच.वनिता मधुकर सुरवसे यांना (सुपरवूमन) म्हणून राज्यस्तरीय नारी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्यात आला.
.      दरम्‍यान, समाजात काम करताना आपली शाबासकी रुपाने पाठीवर पडलेली आपली कौतुकाची थाप ही आम्‍हाला उर्जा देणारी आहे. दैनिक प्रभात आयोजित केलेला हा सन्‍मान सोहळा आम्‍हाला नवी प्रेरणा देणारा, जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे, अशी उत्‍स्फूर्त प्रतिक्रिया सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी केली. यासोबतच उद्योग, व्‍यवसाय, शिक्षणसंस्‍था, कृषी क्षेत्रात आपल्‍या वेगळ्या संकल्‍पनेने समाजातील आपल्‍यासारख्याच महिलांसमोर, एक वेगळी आदर्श अशी पायवाट घालून देणाऱ्या राज्यातील कर्तृत्‍ववान महिलांचा (सुपरवूमन) सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरव करण्यासाठी दैनिक प्रभात यांचे मनस्वी आभार मानले आणि ज्यांच्यामुळे मला पुरस्कार मिळाला  ते आमच्या आमदार  सचिन  कल्याणशेट्टी, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष एडवोकेट विकास जाधव , व गावातील माझे सहकारी बंधू  यांचेही  सरपंच सुरवसे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे.
प्रतिकूल परिस्थितीशी सामोरे जात असताना, प्रवाहाविरोधात जाण्याची धमक, सामाजिक परिवर्तन घडवण्याची शक्‍ती आणि समुदायापुरती असणारी आत्मियता असे अनेक गुण अंगी बाणवणाऱ्या महिलांचा यथोचित सन्‍मान यावेळी टाळ्यांच्‍या प्रचंड कडकडाटात करण्यात आला. त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाला सलाम करण्यासाठी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चित्रा खरे यांनी केले, तर श्रीनिवास वारुंजीकर यांनी आभार मानले.
Previous Post

अक्कलकोटच्या शोभायात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्य, मुस्लिम बांधवांकडून पुष्पगुच्छ व पाण्याचे बॉटल देऊन शोभायात्रेचं स्वागत! 

Next Post

हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न

Admin

Admin

Next Post
हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न

हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697