Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

म.राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या रजा काम बंद आंदोलनास रा.स.क.म. संघटनेचा पाठिंबा

Admin by Admin
March 5, 2025
in सोलापूर
0
म.राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या रजा काम बंद आंदोलनास रा.स.क.म. संघटनेचा पाठिंबा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर ( रमेश सुरवसे ) महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी, पुणे विभाग पुणे संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मा.उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे विभाग पुणे यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दि. 27/02/2025 रोजी विविध मागण्यासाठी बैठक होऊन उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांना एकुण 27 महत्वाच्या मागणीच्या निवेदनातील मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे विभाग पुणे यांनी दि.03/03/25 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबतची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिलेले होते.परंतु त्यां लेखी आश्वासनाची अद्याप पर्यंत पूर्तता झालेली नाहीं.यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतन वाढीसाठी व अन्य आपल्या महत्वाच्या न्यायिक मागण्यासाठी कालपासून सदरचे सामूहिक रजा काम बंद करण्यात आंदोलन करण्यात येत असुन या आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा सोलापूर ही संपूर्ण एकसंघ ताकदिनीशी खंबीरपणे उभे राहुन पाठिंबा दिला असुन महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्या मान्य होई पर्यंत या आंदोलनामध्ये रासकम.संघटनेचे प्रमुख जबाबदार नेतेगण सहभागी झाले असुन या सामूहिक रजा काम बंद आंदोलनास पाठिंबा दिलेले आहेत.सदरच्या आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे युवा नेते विजयकुमार भांगे, ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे, खंबीरपणे सदैव साथ देणारे सी.एस.स्वामी, राजाभाऊ सोनकांबळे, आर.जे.शिंदे, हुसेन बाशा मुजावर, शिवानंद चडचण आणि सोलापूर जिल्हा आय.टी. आय.गट निदेशक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिरीष शेळके आदीनी सामूहिक रजा काम बंद आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे तडफदार जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,जिल्हा उपाध्यक्ष हणमंत साखरे, प्रमुख मार्गदर्शक प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या काम बंद आंदोलनामध्ये म. राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे प्रमुख गौरीशंकर वाडीकर, शिवदास शितोळे, प्रविण ननावरे, यांच्यासह महिला कर्मचारी प्रतिनिधी माधुरी काळे, काशीबाई गायकवाड शिवमाला सोनवले यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने या सामूहिक रजा काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Previous Post

लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात नेमके किती रुपये मिळणार ?

Next Post

आमदार राजेश पवार यांच्या स्वखर्चातून नायगाव बैलबाजारात पाण्याच्या कुंड्या

Admin

Admin

Next Post
आमदार राजेश पवार यांच्या स्वखर्चातून नायगाव बैलबाजारात पाण्याच्या कुंड्या

आमदार राजेश पवार यांच्या स्वखर्चातून नायगाव बैलबाजारात पाण्याच्या कुंड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156508
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697