शैक्षणिक
नगम्मा रवींद्र बजे हिची मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर गावची कन्या नगम्मा रवींद्र बजे हिची मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.भारतातील बेस्ट ऑफ ६ खेळाडूमध्ये निवड झाली आहे.
नगम्मा बजे या बांबू उडी खेळ प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला आहे.
नगम्मा रवींद्र बजे आता पर्यंत दोन वेळा राज्य स्तरावर आणि एक राष्ट्रीय स्तरावर खेळात भाग घेतला आहे.
पहिला राज्य स्तरीय खेळ नागपूर येते २०१७/ २०१८ या वर्षी खेळण्यात आले .दुसरी राज्य स्तरीय खेळ कराड येथे २०१८/ २०१९ या वर्षी खेळण्यात आले.
तिसरी राज्य स्तरीय शालेय मैदानी क्रिड स्पर्धा सातारा येथे नगम्मा बजे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तो खेळ २०१९/ २०२० या वर्षी खेळण्यात आले.
त्याच वर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी नगम्मा बजे हिची पंजाब सांगरूर येथे निवड झाली.
२० वर्षीय वयोगटात पुन्हा एकदा सासंम येथे नगम्मा बजे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तो खेळ २०२१/ २०२२ या वर्षी खेळण्यात आले.
नगम्मा बजे हिची भारतातील बेस्ट ऑफ ६ खेळाडूमध्ये निवड झाली आहे.
मध्यप्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल कोचच्या अंडर प्रशिक्षणासाठी सुद्धा नगम्मा बजे चीं निवड झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर सारख्या गावातून नगम्मा बजे हिने बांबू उडी खेळ प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असून ही नगम्मा बजे ही खेळाडू जिद्दीने पुढे जात आहे. तिच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.