राजकीय

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुसऱ्यांदा विजयी

अक्कलकोट (प्रतिनिधी )२५०  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुसऱ्यांदा विजयी होत ४९ हजार ५७२ इतक्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. सचिन कल्याणशेट्टी यांनी  काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दुसऱ्यादां  पराभव केला.  त्यांच्या विजयाबद्दल अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे  पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीतील  मतमोजणी  दि. २३ नोव्हेंबर रोजी  अक्कलकोट शहरातील नविन तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये भाजपा महायुतीचे  उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ७२६९ मते मिळाली तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ४२७३ मते मिळाली .दुसऱ्या फेरीमध्ये भाजपा माहितीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना  ७१३८  मते मिळाली तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४२९७ मते मिळाली. तिसऱ्या फेरीमध्ये भाजपा माहितीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ७५१० मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे  यांना ३४६४ मते मिळाली. चौथ्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ३५०१ आमदार सचिन कल्याणशेट्टी ६४४१ मते मिळाली.पाचव्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ६१०३ तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४२३१ मते मिळाली. सहाव्या फेरीमध्ये माहितीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ७३०३ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४८७० मते मिळाली. सातव्या फेरीमध्ये माहितीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना .५८४०  मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे  यांना ४२१९ मते मिळाली आहेत. आठव्या फेरीत  महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ६३१५ तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ३५५९   मते मिळाली..नवव्या फेरीत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी  यांना ५७८८ मते तर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ३५८७ मते मिळाली..दहाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ५७८१ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हत्रे यांना ४१२५ मते मिळाली. अकरावी फेरी महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ५८८६ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हत्रे यांना २९८५  मते मिळाली.बारावी फेरी  महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ४९५१ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ५३१६ मते मिळाली.तेरावी फेरीमध्ये भाजपा  उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ४६९३ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना २६४४ मते मिळाले. चौदावी  फेरी भाजपा उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ६४५९ मते तर काँग्रेस बाल विकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४२२७  मते मिळाली..पंधराव्या फेरी अखेरीस भाजपा उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ७८८३ मते काँग्रेस भाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे  यांना २८१६ मते मिळाली. १६  व्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ६८३५ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना २५२१ मते मिळाली .सतराव्या फेरीमध्ये भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ५६९३ मते काँग्रेस पक्ष उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४२०० मते मिळाली. १८ व्या फेरीत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ४९२८ मते तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ३३६५ मते मिळाली .एकोणिसाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ५१८४ मते काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ३३४४ मते मिळाली. विसाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ५६५६ मते मिळाली. तर काँग्रेस पक्ष उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ३९५७ मते मिळाली.. २१ व्या फेरीत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ५९९० मते तर काँग्रेस पक्ष उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४०३३ मते मिळाली. बाविसाव्या फेरीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४३६९ तर महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ४६९७ मते मिळाली. .तेविसाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ५३१३ मते तर काँग्रेस पक्ष उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४४१५ मते मिळाली.24व्या फेरीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ४७०८ मते तर महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी  यांना ४६९६ मते मिळाली. २५ व्या फेरीत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना २८१२ मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ४५६६ मते मिळाली..भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना एकूण एक लाख ४८ हजार १०५ मते मिळाली तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना ९८ हजार ५३३ मते मिळाली. या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या ४९ हजार ५७२  इतके मताधिक्य मिळवत विजय मिळविला आहे.. भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विजय मिळविल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये या विजयाबद्दल भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी गावोगावी अक्कलकोट शहरांमध्ये मोठा जल्लोष केला. फटाके फोडून पेढे वाटून गुलालाची मुक्त उधळण करत महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र करण्यात आला.या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हा विजय जनतेचा आणि  महायुती च्या कार्यकर्त्यांचा आहे. महायुती  सरकारने राज्यात विविध विकास कामे केली आहेत. जनतेने विकासाला मतदान केले आहे. लाडक्या बहिणीने भरघोस मते ही महायुतीच्या पारड्यात घातली आहेत. मतदारानी विकास कामांच्या बाजूने कौल दिला आहे असे यावेळी सांगितले .अक्कलकोट विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे उमेदवार मल्लिनाथ पाटील यांना १२८९ मते , इकरार शेख बहुजन समाज पार्टी ६९२, जमीर शेख प्रहार जनशक्ती पार्टी ७९५, सुनिल बंडगर रासप १३१२, संतोषकमार इंगळे वंचित आघाडी ३७९०, पुजा पाटील अपक्ष १४९ प्रसाद बाबानगरे अपक्ष २४३, शिवलिंगप्पा वंगे अपक्ष  ४२२, सिद्धाराम कोळी अपक्ष २२८ , ज्ञानोबा साळुंखे अपक्ष ३११ नोटा -११०४ , बाद मते – ११८  अशी मते मिळाली.अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी साठी पोलिसांचा चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशांत बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनायक मगर , गटविकास अधिकारी कवितके मैंदर्गी न प. मुख्याधिकारी सुरवसे , अक्कलकोट न प मुख्याधिकारी रमाकांत डाके , नायब तहसीलदार विकास पवार , भंडारे , गायकवाड  आदींनी काम केले. तसेच सर्व महसूल प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button