Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर आश्रमशाळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनहळळी आश्रमशाळेची उत्तुंग झेप

Admin by Admin
January 10, 2025
in शैक्षणिक
0
सोलापूर आश्रमशाळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनहळळी आश्रमशाळेची उत्तुंग झेप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
आश्रमशाळेतील विदयार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन चिकित्सिक, खिलाडू वृत्ती व बौध्दिक क्षमतेचा विकास व्हावा हा उददेश डोळयासमोर ठेवून इतर मागास बहुजन कल्याण सोलापूरच्या सहायक संचालक श्रीम.मनिषा फुले यांच्या मार्गदर्शनाने जिल्हयातील आश्रमशाळेत क्रिडा, सांस्कृतिक, चित्रकला, बुध्दिबळ स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर जिल्हयातील एकूण ९७ आश्रमशाळा असून त्याचे चार विभाग करुन त्या स्तरावर स्पर्धा संपन्न झाल्या. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कामती ता. मोहोळ येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. प्रत्येक विभागातून प्रथम तीन याप्रमाणे ३६ शाळांनी जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला.
माध्यमिक गटातून नागनहळळीच्या जमीर जमादार, जुबेर जमादार व बसवराज आजूरे यांनी Multipurpose Agriculture Equipment या वैज्ञानिक उपकरणाची निर्मिती केली. त्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाले.हे उपकरण सौर उर्जेवर कार्यन्वित होत असून शेतातील तण काढण्यासाठी, पिकावरील औषध फवारणीसाठी व शेती कामासाठी वापर करता येते. हे यंत्र रिमोट कंट्रालव्दारे लांब राहून नियंत्रित करता येते. तसेच जे यंत्राव्दारे कार्य चालू आहे ते कॅमेराव्दारे आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवरती पाहता येते.
उच्च माध्यमिक गटातून विज्ञान शाखेतील जोहा पिरजादे, तस्मिया बागवान व साधना काळे या विदयार्थीनीनी Smart Shoes For Blind Person या वैज्ञानिक उपकरणाची निर्मिती केली. याचा उपयोग समाजातील अंध व्यक्तींना पायी चालत असताना पुढे येणारे अडथळयाची माहिती सेन्सरच्या माध्यमातून संदेश प्राप्त होतो. यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कुंटुंबातील इतर व्यक्तीना अंध व्यक्ती कोठे आहे याची माहिती मिळते. जिल्हा स्तरावरील चित्रकला स्पर्धेत श्वेता प्याटी या विदयार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावले. या विदयार्थ्याना विज्ञान शिक्षक प्रा. नवले, प्रा. पाटील, प्रा.वशीम शेख, प्रा. श्रीम. मिठारी, शिक्षक बशेटटी , शिक्षक मोहन गुरव, प्रयोगशाळा सहायक . नुरुददीन शेख यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव  जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक रईस अहमद शेख व प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले. 
Previous Post

अ.भा.युनाटेड किसान सभेच्या वतीने नायगाव येथे मागणी दिवस साजरा

Next Post

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार

Admin

Admin

Next Post
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा अक्कलकोट कामगार सेना व महिला आघाडीतर्फे  सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697