महाराष्ट्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

पुणे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.थोर विचारवंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन बहुजन समाजासाठी सतत संघर्ष करणारे शिवश्री प्रविणदादा गायकवाड यांच्यावर भाजपच्या गुंडांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रविण गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा अधिक बळकट होण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.



