Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रीपद मिळणार का ? सर्वत्र चर्चा रंगली 

Admin by Admin
December 9, 2024
in राजकीय
0
मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष ! आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रीपद मिळणार का ? सर्वत्र चर्चा रंगली 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आता त्यांची वर्णी ही राज्याच्या मंत्रिमंडळात लागणार का ?  याकडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. याबाबत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ४९ हजार ५७२  इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा त्यांनी दुसऱ्यांदा पराभव केला आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची दिनांक १२ डिसेंबर रोजी राज्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात  त्यांची निवड होणार का ? मंत्री म्हणून त्यांची निवड होणार का ? याकडे आता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जबाबदारी सोपवलेली आहे. ती यशस्वीपणे पार पाडण्याचे काम आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आजपर्यंत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यातून सुरू असून तशी चर्चा ही अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील  जनतेमधून सुरू आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयाचीं विकास कामे केली आहेत. त्यांच्या विकास कामाच्या बळावरच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळामध्ये हजारो कोटींचा निधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिला आहे.यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामे ही मार्गी लागली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून दोन-तीन नावाची चर्चा सुरू असून या नावांमध्ये अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवा आमदार असलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देणार अशी आशा सर्वत्र निर्माण झाली आहे.दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे आता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.या अगोदर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून कैलासवासी श्रीमंत निर्मलाराजे भोसले, कैलासवासी पार्वतीबाई मलगोंडा तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जर मंत्रिमंडळात निवड झाल्यास तर ते चौथे मंत्री अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून ठरतील.
Previous Post

मारकडवाडीतून राहुल गांधींचा लाँग मार्च

Next Post

घुंगराळा येथे खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धेत विजय शिंदे ठरला खंडोबा केसरी

Admin

Admin

Next Post
घुंगराळा येथे खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धेत विजय शिंदे ठरला खंडोबा केसरी

घुंगराळा येथे खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धेत विजय शिंदे ठरला खंडोबा केसरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157270
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697