टॉप न्यूज

मारकडवाडीतून राहुल गांधींचा लाँग मार्च

ईव्हीएम विरोधात पडलेली ठिणगी देशभर वणवा पेटवेल : आ. उत्तम जानकर
अकलूज -: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यावरुन आता विरोधक राज्यभरात ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी टाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे माकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला त्यांची सत्यता तपासण्यासाठी थेट
मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मागणी केला. या घटनेने राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेचा विषय ठरले होते. ही मतदान प्रक्रि या पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकड वाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी होता. हि मागणी प्रशासनाने फेटाळली होती. यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी बैलेट पेपरवरील मतदान करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केले. प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.
संताप विरोधात असणार आहे. यासाठी करण्यात येणार आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले यावेळी सोलानुचतील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.
वंचितकडूनही ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाची हाक –
सोलापुरातील
वंचित बहुजन आघाडीच्या  वतीने राज्यभरात ईव्हिएम  विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करून 
माकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या ३ ते १६ डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न –
या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जळण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी या ठिकाणी ईव्हीएम विरोधात पडलेली ठिणगी देशभर वनवा पेटवेल, असा विश्वास आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button