सामाजिक

राज्य परिवहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने अभिवादन

 

सोलापूर ( रमेश सुरवसे ) :-विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस सोलापूर आगार व्यवस्थापक मा.उत्तम जुंधळे आणि वाहतुक निरीक्षक मा. अक्षय वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर मध्यवर्ती बस स्थानकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर आदी राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे,अवस्था रोमन साहेब, सहाय्यक लेखागार विशाल दिलपाक, महाजन साहेब, संतोष जोशी काका, सुनील भोसले, जेष्ठ नेते व संचालक मनोज मुदलियार, यांच्यासह कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय प्रमुख संघटक प्रमुख नागनाथ सर्वगोड आदी सर्वजण सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळ जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बनसोडे, खजिनदार दयानंद सर्वगोड, आधारस्तंभ आणि कास्ट्राईब राप.संघटनेचे विभागीय ज्येष्ठ नेते नागनाथ सर्वगोड, तानाजी भडकुंबे, संतोष साबळे, अनिल गायकवाड, अखिलेश काटे यांच्यासह राज्य परिवहन मार्ग महामंडळातील चालक, वाहक कर्मचारी यांच्यासह महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button