Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षण वाचवायचे असेल, तर गॅस सिलिंडरशिवाय पर्याय नाही

Admin by Admin
November 10, 2024
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षण वाचवायचे असेल, तर गॅस सिलिंडरशिवाय पर्याय नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फुले शाहू आंबेडकर यांचा लढा आणि
आरक्षण त्यांच्या डोळ्यात सलतंय !

सोलापूर : गेल्या हजारो वर्षांच्या नंतर जो लढा महात्मा फुले, शाहू महाराज यांनी सुरू केला त्याला बाबासाहेब पुढे घेऊन गेले. त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून हा लढा उभा केला आणि कायम केला. जे आज इतरांच्या डोळ्यात सलत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथील जोशाबा महासंकल्प सभेत केले.

ॲड. आंबेडकर यांनी म्हणाले की, आम्ही भर पावसात आरक्षण बचाव यात्रा काढली, तेव्हा ओबीसीमधील अनेक लहान लहान समूहांची मागणी होती की, ही यात्रा थांबता कामा नये. भाजपने नवीन घोषणा काढली आहे “बटेंगे तो कटेंगे”  सगळे हिंदू एकत्र राहिले पाहिजेत. मान्य आहे, पण ओबीसींनी त्यांना विचारले पाहिजे की, तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करत आहात.

ओबीसी उमेदवारांच्या संख्येवरून आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना लक्ष्य करत म्हटले आहे की, मी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवार याद्यांची बेरीज वजाबाकी करत बसलो होतो. एकाने 32 ओबीसी उमेदवार दिले आहेत आणि दुसऱ्याने 28 ओबीसी उमेदवार दिले आहेत. म्हणजे ओबीसी आरक्षण घालवायची सुरुवात झाली आहे. आता आरक्षण वाचवायचे असेल तर गॅस सिलिंडरशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिका यामध्ये ओबीसी आरक्षण आहे का ? तर यामध्ये ओबीसी आरक्षण नाही. सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांपूर्वी निर्णय दिला आहे की, तुम्हाला जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर घ्या पण ओबीसी आरक्षण वगळून घ्या, असे म्हणत आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर प्रकाश टाकला.

प्रत्येक सभेत मोदी येतात, संविधान डोक्याला लावतात आणि म्हणतात हे माझे बायबल आहे. हे जरी ते म्हणत असले तरी या बायबलमधील आत्मा जो आहे तो काढून घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीत सुरू झाली असल्याचाही आरोप त्यांनी केला.

एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लीम हे आमचे मित्र आहेत. आज आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आहोत. म्हणून माझे आवाहन आहे की, गॅस सिलिंडर या चिन्हावरतीच आपण मतदान केले पाहिजे असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

Previous Post

जेसीबीच्या साह्याने फुले उधळून वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे स्वागत

Next Post

अरुण पवार यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Admin

Admin

Next Post
अरुण पवार यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

अरुण पवार यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697