डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

अक्कलकोट, ( प्रतिनिधी ).:- कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते राजा माने यांचा स्वामी समर्थ मंदिरात सत्कार करण्यात आला. तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासात कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते राजा माने यांचा सत्कार करण्यात आला. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी समर्थांची प्रतिमा व प्रसाद देवून सत्कार केला.याप्रसंगी पत्रकार स्वामीराव गायकवाड ,राजेश जगताप ,सिद्धू पुजारी ,पत्रकार शिवानंद फुलारी, मुंबईचे उद्योजक सिध्देश्वर चव्हाण,कुंदन हुलावळे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक विजय बोराडे,प्रा.राम तांबट उपस्थित होते.