Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

Admin by Admin
October 1, 2024
in टॉप न्यूज
0
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून या विधानसभेची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजपा महायुतीकडून तयारी सुरू असून या मतदारसंघात क्रेझ कोणाची याबाबत चर्चा रंगली आहे.
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेस पक्षाचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते विकास , विविध देवस्थानांचा विकास , सभा मंडप बांधणे , मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी विविध विकास कामे जोमाने सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच उजनी धरणातून कुरनूर धरणात पाणी आणल्याचा दावा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. अक्कलकोट शहरात नवीन बस स्थानक उभारणी, श्री मल्लिकार्जुन मंदिराची उभारणी, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी  कोट्यावधी रुपयाच्या निधीचा पाठपुरावा करून विविध विकास कामांची पूर्तता करणे याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोर दिला आहे. सध्याच्या यंग जनरेशन वर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मोठी भुरळ पडली आहे. यामुळे युवक वर्ग हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागे असल्याचे सध्या दिसत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मोठी क्रेझ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. दुसरीकडे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवर लक्ष केंद्रित करून कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात उजनीचे पाणी आणण्यासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्र यांचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. उजनी धरणातील पाणी हे माजी मंत्री सिद्धाराम मेहेत्रे यांच्यामुळेच आल्याचे काँग्रेस नेतेमंडळी सांगत आहे. उजनीच्या पाण्याचा संघर्ष हा मतदारांना माहित आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचे खरे जनक कोण हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना माहित आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मानणारा मोठा वर्ग असून हा वर्ग सदैव माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी असतो. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची जनमानसात वेगळी क्रेझ आहे. सध्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व महाविकास आघाडीतील नेते हे आवाज उठवित आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी विविध कार्यक्रमाद्वारे विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ केल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक जरी नोव्हेंबर मध्ये असली तरी दोन्ही नेत्यांनी मात्र आतापासूनच नागरिकांच्या भेटी घेऊन कंबर कसली आहे. भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विकास कामे आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून झालेली विकास कामे यावरून या दोन्ही नेत्यांची क्रेझ मतदार संघात निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या क्रेझबद्दल सध्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मोठी चर्चा रंगली आहे.

Previous Post

सोलापूर येथील जिल्हा  शल्य चिकित्सा सोलापूर कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

Next Post

बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान

Admin

Admin

Next Post
बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ  मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान

बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697