महाराष्ट्र

माजलगावात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात ! विश्र्वशांतीसाठी प्रार्थना. मिरवणुकीत हजारो तरुणांचा सहभाग

 

माजलगाव / बीड ( नाजेर कुरेशी )माजलगावात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम समुदायाकडून देशात सुख शांती,एकोपा नांदो!अशी विश्वशांतीसाठी रविवारी प्रार्थना करण्यात आली.यावेळी अहेले सुन्नत वल जमातच्या वतीने शहरात(मिरवणूक)जुलूस उत्साहात काढण्यात आली.दरम्यान धार्मिक ध्वज फडकवण्यात आले.मुस्लिम समाजातील लोकांमध्ये ईद-ए-मिलादला मोठे धार्मिक महत्त्व आहे.हा दिवस जगभरातील सर्व मुस्लिम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. यानिमित्त शहरातील अहेले सुन्नत वल जमातच्या वतीने जल्लोषात मरकझी जुलुसे(मिरवणूक) आयोजन केले होते.या मिरवणुकीत अबाल- वृद्धांनी धार्मिक ध्वज पताका घेत जशने ईद मिलादुन्नबी जिंदाबाद,नारा ए तकबीर अल्लाहू अकबर अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.पोलिस प्रशासनातर्फे मिरवणुकीचे(जुलूस) स्वागत करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी काही तरुण संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी भक्तांना मिठाईचे,वाटप केले.याप्रसंगी मिरवणूक जुलूस कमिटीचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले सय्यद सलीमबापू यांच्यासह सय्यद सिराजोद्दीन कादरी,युसुफोद्दीन कादरी,आगाखान,खतीब अलीमोद्दीन,शेख मुस्किम बाबा, सय्यद रईस कादरी,शेख मेहबूब, सय्यद रफिक कादरी,शेख आसेफभाऊ,सय्यद फारुखअण्णा, सय्यद तौफिक कादरी,सय्यद रहीम,इर्शाद इनामदार,सय्यद समीर,इलियास शेख,शेख फेरोज, महेमूद मिर्झा इत्यादीचे निटके नियोजन होते.माजी नप बांधकाम सभापती राजेश साळवे,नगरसेवक सुशांत पौळ,अशोक लांडगेसर पत्रकार नाजेर भाई कुरेशी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button