Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज

Admin by Admin
September 14, 2024
in टॉप न्यूज
0
लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कन्नड -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण*’ योजनेचा लाभ मिळावा,यासाठी कन्नड तालुक्यातील १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली असून याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी दिली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले असून त्यातील ९० हजार ९५७ मंजूर करण्यात आले आहेत,
तसेच तांत्रिक कारणाने ४२८ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत,तर ३५७ रद्द केले आहेत.
दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जांची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी पडताळणी केली असता भलतेच प्रकार समोर आले.तालुक्यातील १२ जणांनी स्वत:च्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले.आधार कार्डही स्वत:च्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वत:च्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले.
या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आले.संबंधित कर्मचाऱ्यांनी ही माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांना दिली.
त्यानंतर राठोड यांनीही याबाबत पडताळणी केली, असता त्यात तथ्य आढळले.त्यानंतर त्यांनी हे सर्व १२ अर्ज रद्द केले.त्यानंतर या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव १० सप्टेंबर २०२४ रोजी वरिष्ठांना सादर केला.याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल,
असे बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी सांगितले.फुकटच्या पैशांसाठी काहीही -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
ही योजना पात्र महिला लाभार्थ्यांसाठी असली तर पोर्टलवर या योजनेच्या लाभासाठी दाखल झालेले अर्ज तातडीने मंजूर होत असल्याचे आपले अर्जही त्वरित मंजूर होतील व दरमहा आपणासही फुकटात दीड हजार रुपये मिळतील,
असे समजून या १२ पुरुषांनी अर्ज दाखल केले;
परंतु महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावत बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या भावांना उघडे पाडले.आता प्रशासन अशा फसव्या भावांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वागदरी येथील  रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

Next Post

दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू

Admin

Admin

Next Post
दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू

दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697