शैक्षणिक
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न.

अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी झाला.व श्रीकृष्णाला दही, दुध, लोणी खुप आवडत असे.मात्र माय यशोदा कृष्णापासून दह्याचे रक्षण करण्यासाठी हंडी उंच ठिकाणी किंवा शिंक्यावर ठेवत असे, पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे व यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असंत. याची आठवण म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा ( गोपाळ काला) उत्सव सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा केला जातो. याच धर्तीवर महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य व उच्च माध्य मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात दहीहंडी चा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. सर्व वर्गाच्या संघानी उस्फुर्त सहभागासह भरभरून प्रतिसाद दिला. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक . मलकप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते बाळ श्री कृष्ण मुर्ती च्या प्रतिमेचे पुजन करण्यात आला यावेळी सेमी विभागाचे दिगंबर जगताप व इतर शिक्षक उपस्थित होते. याक्षणी “श्री कृष्ण- राधा” च्या वेशभूषेतील काही मुलीनी ‘कृष्ण जन्मला ग बाई’, ‘मैय्या यशोदा’ या विशिष्ट अशा गाण्यावर सुंदर नृत्य केल्या. यानंतर या उत्सवात पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलां- मुलींनी बनवलेल्या प्रत्येक संघाने मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा छान प्रयत्न केला. “गोविंदा आला रे आला”असा एकच जल्लोष केला. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या दहीहंडी कार्यक्रमाच्या आनंददायी उत्सवाच्या चांगल्या पद्धतीने केलेल्या नियोजनाबद्दल शिक्षकांचे व या साहसी खेळात उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या व जिंकलेल्या सर्व मुलां- मुलींचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार . सचिन कल्याणशेट्टी,जेष्ठ संचालक व मार्गदर्शक . मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक . मल्लिकार्जुन मसुती,सी.ई.ओ..रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख . पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले.
