सामाजिक

अक्कलकोट शहरातील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर भाग कोसळला

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील जुना अडत बाजार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी भाजी मंडई समोरील नगरपालिकेच्या मालकीचे असणाऱ्या  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर चा जीर्ण इमारतीचा काही भाग रविवार दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास कोसळल्याने नागरिकात  चिंतेचे वातावरण पसरले  आहे. यामुळे नगरपालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जुन्या इमारतींचे सर्वे नगरपालिकेने केलेले आहेत का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 अक्कलकोट शहरातील जुना अडत बाजार परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर हे नगरपालिकेच्या मालकीचे आहे. या शॉपिंग सेंटरच्या वर हत्तीरोग ऑफिस  कार्यान्वित होते. पण इमारत जिर्ण   झाल्याने ते कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरचा जीर्ण झालेला वरचा भाग हा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास कोसळला. यावेळी रहदारीचा परिसर असल्याने  सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.  हा इमारतीचा भाग कोसळल्याने नागरिकात खळबळ उडाली. हा इमारतीचा भाग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरची ही इमारत गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झालेले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून या  इमारतीकडे दुर्लक्ष झालेले आहे. वास्तविक पाहता ही धोकादायक इमारत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पाडणे गरजेचे आहे. असे असताना नगरपालिका प्रशासन हे नागरिकांच्या जीवाशी नाहक खेळत असल्याचे  नागरिकांतून बोलले जात आहे. नगरपालिकेच्या एकूणच कारभाराबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अक्कलकोट शहरातील एवन चौकातील श्री स्वामी समर्थ  उद्यानाच्या परिसरातील शॉपिंग सेंटर ही जीर्ण झाले असून हा शॉपिंग सेंटर चा भाग कोसळल्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील शॉपिंग सेंटरच्या बांधकामांचे ऑडिट करणे गरजेचे असून याकडे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button