क्राईम

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची अवैध दारूविक्रीविरुद्ध कारवाई; दोन गुन्हे दाखल

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूविक्रीविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी दिनांक २५ ऑगस्ट  व ३० ऑगस्ट  रोजी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत एकूण १५ हजार २४५ रुपये किमतीची देशी/विदेशी दारू जप्त करून दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील तडवळ येथे कारवाई : –
दिनांक २५ ऑगस्ट  रोजी सुमारे ३.३०  वाजता मौजे तडवळ ते पानमंगरूळ जाणाऱ्या रोडलगत असलेल्या तडवळ गावच्या हद्दीत आरोपी शांतप्पा शिवण्णा चुरटे, वय ३८ वर्षे, रा. माणेशेट्टी गल्ली, तडवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर याच्याकडून विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या असा एकूण २ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच सुळेगावजवळ येथे कारवाई करण्यात आली.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्री   मौजे सुळेगावजवळील सरकार धाब्याचे मागे आडोशाला, सुलेरजवळगे ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथे कारवाई करण्यात आली. आरोपी ज्ञानेश्वर राम शिंदे, वय २७ वर्षे व आकाश गंगाधर अर्जुन दोघे, रा. सुळेगावजवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या असा एकूण  १२ हजार ३२५ रुपये- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण १५ हजार २४५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक  विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे पोलिसांनी केली असून, पुढील तपास पोलीस अंमलदारांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button