राजकीय

रिपब्लिकन सेनेची सोलापूर लोकसभा व जिल्हास्तरीय महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी ) : रिपब्लिकन सेनेची सोलापूर लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बैठक बुधवारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी , प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव  तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सय्यद युसुफ  यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे  यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीत सोलापूर लोकसभा व जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम, संघटन विस्तार, पक्षशिस्त आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. संघटना अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि आक्रमक करण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
माढा व पंढरपूरच्या निवडी रद्द; नव्या नियुक्त्या जाहीर
यावेळी पंढरपूर तालुका तसेच माढा लोकसभा येथील यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व निवडी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी यांनी रद्द करून नव्याने पदाधिकारी निवडी जाहीर केल्या.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख निवडी
 माढा लोकसभा महिला अध्यक्ष — आशाताई रिकिबे
 पंढरपूर तालुका अध्यक्ष — सचिन जाधव
 सोलापूर शहर युवक अध्यक्ष — सुबोध सोनकांबळे
 सोलापूर शहर महिला अध्यक्ष — राधाबाई गायकवाड
 सोलापूर शहर महासचिव — इमरान भाई बागवान
 सोलापूर लोकसभा जिल्हा सचिव — विश्वास गायकवाड
  मोहोळ तालुकाध्यक्ष  –  पांडुरंग दावणे 
 माढा लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष — कुंडलिक साठे
 दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष — संतोष फडतरे
 दक्षिण सोलापूर युवा अध्यक्ष — वैभव गायकवाड
 दक्षिण सोलापूर युवा महासचिव — शंकर भडकुंबे
 करमाळा तालुकाध्यक्ष — प्रवीण ओहाळ
 उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष — प्रवीण मसलखांब
 अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष — गणेश भालेराव
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी  यांनी अभिनंदन करून संघटनेच्या विस्तारासाठी शुभेच्छा दिल्या. पद हा सन्मान नसून जबाबदारी आहे, या भावनेतून प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटनेच्या विचारधारेसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी  यांनी पक्षांतर्गत कुरघोड्या, गटबाजी, मनमानी कारभार आणि पक्षाच्या ध्येय-धोरणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
“आता पक्षामध्ये कोणाचाही मनमानी कारभार चालणार नाही.पक्षशिस्त मोडून स्वतःच्या मर्जीने कारभार करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. पक्षाच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.”
असा स्पष्ट आणि ठाम इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिला.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, शहराध्यक्ष शरणू अण्णा हजारे, जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे , शहर उपाध्यक्ष किरण जौंजट, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महेबुब शेख, शहर सचिव विकी बनसोडे, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष मतीन भाई सातखेड, गणेश उपासे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रा.संदीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button