Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

Admin by Admin
January 21, 2026
in राजकीय
0
अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्हा परिषद गटातून एकूण ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर पंचायत समिती गणातून १०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी भली मोठी राग लागली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १७६ उमेदवारानी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तहसील कार्यालयात भाजपा काँग्रेस शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बुधवारी शेवटच्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये चपळगाव गटातून चार वागदरी गटातून १३, जेऊर गटातून  १९,मंगरूळ गटातून बारा ,नागणसूर गटातून आठ , सलगर गटातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पंचायत समिती गणातून चपळगाव आठ , कुरनूर नऊ ,वागदरी १४ , शिरवळ ९, दहिटणे आठ ,जेऊर ६ , सुलेर जवळगे १० , मंगरूळ पाच , नागणसूर पाच, तोळनूर सहा , सलगर १७ , मुगळी आठ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी सचिन कल्याणशेट्टी, चपळगाव गणातून सागर कल्याणशेट्टी , वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून प्रवीण दत्तात्रय तानवडे ,कुरनूर गणातून भाजपातर्फे विनोद मोरे , जेऊर पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षातर्फे श्रुती काशिनाथ पाटील , वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपातर्फे राजश्री शेळके आदींसह विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयात रात्री नऊ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
Previous Post

अमोलराजे भोसले मित्र परिवार व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार

Next Post

सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांचा सत्कार 

Admin

Admin

Next Post
सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांचा सत्कार 

सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांचा सत्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157258
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697