महाराष्ट्र

कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते बाबा आढाव यांचे आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाबा आढाव यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुना (Pune) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली होती. पवारांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. सामाजिक क्षेत्रातील दोन मोठ्या नेत्यांचे ऋणानुबंध या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती. सुराणा यांच्या निधनाची घटना ताजी असतानाच, लगेच बाबा आढावांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याने, पुरोगामी आणि समाजवादी विचारधारेला मानणाऱ्या चळवळीसाठी ही दुहेरी आणि मोठी हानी मानली जात आहे. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्यात समर्पित केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका लढवय्या पर्वाचा अंत झाला आहे. कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button