Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राजकीय जीवन प्रवासात समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद मोलाचे – आमदार सचिन  कल्याणशेट्टी

Admin by Admin
November 5, 2025
in सामाजिक
0
राजकीय जीवन प्रवासात समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद मोलाचे – आमदार सचिन  कल्याणशेट्टी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
       मी व माझे संपूर्ण कल्याणशेट्टी कुटूंबातील सदस्य श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आपल्या आज पर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद खुप मोलाचे असल्याचे मनोगत तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. आ.सचिन  कल्याणशेट्टी यांनी आपल्या वाढदिवसा प्रित्यर्थ आज येथील श्री वटवृक्ष मंदीरात येऊन सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या सान्निध्यात श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आ.सचिन  कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.कल्याणशेट्टी बोलत होते.
पुढे बोलताना आ.कल्याणशेट्टी
माझ्या वाढदिवसानिमीत्त तालुक्यातील जनतेने माझ्या प्रती व्यक्त केलेले प्रेम व शुभेच्छा मी अत्यंत मनापासून स्विकारून जनतेने मला तालुक्यातील लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून लोकसेवेची संधी दिल्याबद्दल मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता येथे आलो आहे. सर्वांचे प्रेम, शुभेच्छा स्विकारुन व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची भक्कम साथ व श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद पाठीशी घेऊन यापुढील जीवन वाटचाल करणार आहे. तालुक्यात आणखीन जोमाने कार्य करण्यास स्वामी समर्थांनी आपणांस आशिर्वाद द्यावे याकरीता आज आपल्या वाढदिवसा प्रित्यर्थ श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन  साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, शिवशरण जोजन,  मोतीराम राठोड, मा.नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,  राजू झिंगाडे, मनोज कल्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी, संतोष जमगे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सिध्दाराम कुंभार, संजय पवार,  प्रसाद सोनार आदिसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Previous Post

प्रत्येक कुटुंबाकडे भारतीय संविधानाची प्रत असणे गरजेचे – न्यायाधीश अमित शर्मा

Next Post

त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लाख भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन

Admin

Admin

Next Post
त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लाख भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लाख भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697