सोलापूर

मोहोळ शहर काँग्रेसकडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत काळी दिवाळी साजरी

 

मोहोळ ( प्रतिनिधी ) देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे पक्ष प्रभारी तथा माजी आमदार मोहन जोशी, सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या मार्गदर्शनानुसार आज रोजी मोहोळ शहर काँग्रेस कमिटीची एक अतिशय महत्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व, सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटी यांवर शहर तसेच; मोहोळ तालुक्यातून नियुक्त झालेल्या सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा एक कार्यक्रमदेखील घेण्यात आला.

त्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोहोळ शहरातील तहसील कार्यालयासमोर चटणी-पिठले-ठेचा-भाकरी खाऊन तीव्र स्वरुपामध्ये एक निदर्शन आंदोलन करण्यात आले. आणि, अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शहर व तालुक्यातील नागरिक तसेच; शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत प्रशासनाला रीतसर असे निवेदनही देण्यात आले.

आज संपन्न झालेल्या शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्ष जास्तीतजास्त जागा लढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शहराध्यक्ष किशोर पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा अंजली वस्त्रे-भोसले म्हणाल्या की; आम्ही आज रोजी याठिकाणी राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत काळी दिवाळी साजरी करीत आहोत.
अतिवृष्टी व महापूर यांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत अन्, सगळे होत्याचे नव्हते झालेले आहे. ऐन दिवाळी सणामध्ये शासनाने बाधितांना कुठल्याही प्रकारची मदत व, भरपाई दिलेली नाही म्हणून ह्या शासनाचा निषेध आहे असे म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश हावळे म्हणाले की; हे राज्य सरकार फसवे असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.

सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार सुरेश शिवपुजे म्हणाले की; ह्या दिवाळी सणात शेतकऱ्यांना खायला काहीच नाही. त्यामुळे, आम्ही याठिकाणी पिठले-भाकरी-ठेचा-चटणी खाऊन काळी दिवाळी साजरी करीत आहोत.

सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सिद्राम पवार इथे म्हणाले की; शासनाने अतिवृष्टी व, महापूर यांमुळे बाधितांसाठी कोणताच ठोस असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, आम्ही ह्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतो.

आजच्या बैठकीसाठी व आंदोलनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड.पोपटराव कुंभार, चिटणीस बिरासाहेब खरात, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा रतन कसबे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली मोहिते, अनिता बळवदकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल टिळेकर, चिटणीस शालोमन पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, शहर काँग्रेसचे अमजद शेख, उपाध्यक्ष केराप्पा गाढवे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष दाजीसाहेब कोकाटे, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, रशीद पठाण, बबन नरोटे, बबन पवार, हरिदास आष्टुळ, रमेश कोळी, महादेव शिंदे, उत्तम कदम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button