अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावास खा. प्रणिती शिंदे यांची भेट

अक्कलकोट:- (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्याच्या खा. प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील डोंबर जवळगे , नन्हेगाव गावास भेट देऊन बुधवारी दौरा केला. अक्कलकोट तालक्यातील गावभेट दौऱ्यासाठी खा.प्रणिती शिंदे सह काका पाटील यांनी नन्हेगांव व डोंबर जवळगे गावास भेट दिली.त्यावेळी उपस्थित नागरिक सरपंच , माझी सरपंच ग्रामपंचायत सदस्या सह परिसरातील हन्नुर, पितापुर, दहिटणेवाडी, बऱ्हाणपूर येथील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व विकासाकामावर खासदार प्रणिती शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.
तसेच निवेदने स्वीकारली. याप्रसंगी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी तूम्ही कामे आणा मी काम करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले. रामपूर दिंडुर मार्गे डोंबर जवळगेस उजनीचे मिळणे कामी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन जकिकोरे, हर्षदीप गायकवाड यांनी शेतकरी व नागरिकांच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे प्रमुख मागणी केली.या गावभेट दौऱ्यास परिसरातील हजरत पटेल , रहीम फुलारी, राजू पाटील, संजय घोडके, प्रविण हताळे , मल्लिनाथ बंडगर ,अनिल उकरांडे, शिवानंद पाटील, शंबु अकतनाळ, तिपण्णा हेगडे, रेवणाशिध्द तळवार, समर्थ भरमशेट्टी आदीसह ग्रामस्थ उपस्थीत होते.



