सामाजिक

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्ती ७ ऑगस्ट पासून  पुढील तीन वर्षाकरिता किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. सदर दिलेले पद मानद स्वरूपाचे असून भारतीय संविधान , भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फाउंडेशनची आचारसंहिता त्याचे काटेकोर पालन करण्याचे आहे. सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. श्रीकांत पाटील यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर  यांनी नियुक्तीपत्र दिले. श्रीकांत पाटील हे सामाजिक , राजकीय क्षेत्रात काम करत आहेत माहिती अधिकार सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे , माहिती अधिकार सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत कोळी ,माहिती अधिकार महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हावनूर , माहिती अधिकार सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे माहिती अधिकार सोलापूर शहर संपर्कप्रमुख माने गोसावी , सोलापूर शहर संघटक भीमाशंकर पटणे ,माहिती अधिकार सोलापूर शहर महिला गडी संघटक लक्ष्मी यादव यांनी निवडीबद्दल श्रीकांत पाटील यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button