Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत सापडले

Admin by Admin
August 12, 2025
in सामाजिक
0
आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत सापडले

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत आज मंगळवारी सकाळी आठ वाजता बबलाद केटीवेअर बंधाऱ्यात मिळाले.
 अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील २७ वर्षीय युवक रेवणसिद्ध बिराजदार हा आंदेवाडी ज येथील पुलावरून मोटार सायकल वरून दुधनीकडे रविवारी दि. १० ऑगस्ट  सकाळी दहा वाजता निघाला होता. पण आंदेवाडी ज येथील पुलावरून बोरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मोटार सायकलसह तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता तरुणाचा शोध महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाद्वारे सुरू होता. त्या तरुणाच्या शोधासाठी एनडीआरएफ च्या जवानांना बोलावण्यात आले होते. अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर ,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आंदेवाडी ज येथील पुलाची पाहणी करून बेपत्ता तरुण रेवणसिद्ध बिराजदार यांच्या शोधासाठी प्रशासना सूचना केल्या होत्या. अखेर त्या तरुणाचे प्रेत प्रशासनाच्या सजगतेमुळे व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे बबलाद केटीव्हीवर येथे मिळाले. बबलाद केटीवेअर येथे बांधलेल्या जाळीमुळे प्रेत त्यात अडकल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता मिळाले. दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः शोध मोहिमेच्या बोटी मधून पाण्यात जाऊन या शोध कार्यात भाग घेतला होता. तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही आंदेवाडी ज येथील पुलास भेट देऊन या घटनेची माहिती घेतली होती. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनीही आंदेवाडी ज येथील घटनास्थळास भेट देऊन याबाबत गावकऱ्यांशी संवाद साधला होता .गेल्या दोन दिवसापासून आंदेवाडी ज येथील पुलावरून वाहून गेलेल्या युवकास शोधण्यासाठी सर्वांनी जीवाचे रान केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता तरुण रेवणसिद्ध बिराजदार यांचे प्रेत सापडले आहे. यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Previous Post

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत पाटील यांची निवड

Next Post

हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप

Admin

Admin

Next Post
हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप

हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697