Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ  धर्मादाय न्यास संस्थेचा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

Admin by Admin
July 10, 2025
in टॉप न्यूज
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ  धर्मादाय न्यास संस्थेचा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३८ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच गुरुवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने भक्तांची प्रचंड गर्दी झालेली होती. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे. 
दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र  सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, खासदार श्रीरंग बारणे मावळ पुणे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, माजी आमदार आनंदराव पाटील कराड, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, सी.ए. महेश गावस्कर पुणे, उद्योजक भूषण पिटकर पुणे, दादाराजे निपाणीकर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, ह.भ.प.श्री. गंजीधर महाराज नागेश्वर संस्थान, पळसखेडा- मुर्तड ता. भोकरदन, जि जालना, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, कैलास वाडकर, बाळासाहेब दाभेकर, आबा बालगुडे, आरतीताई लिंगायत, निरंजन दाभेकर, श्री व सौ अनिल पाटील ठाणे, रविराज साळुंखे छ.संभाजी नगर, संदीप खर्डेकर, श्री व सौ प्रवीण माने आदि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.    
या विविध कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, अप्पा हंचाटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे-पाटील, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, अशोकराव जाधव, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, रोहित खोबरे, पुणे येथील चंदन बकरे, मयूर कडू, बाळासाहेब जाधव, दिलीप ठोंबरे, मनोज पाटील, अनिल येणकुरे, भीमसेन शेट्टी, राजेंद्र लवाटे, अनिकेत दाभेकर, शोभा दाभेकर, तेजस्वी दाभेकर, शिवतेज दाभेकर, गोटू धनफुले, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, प्रवीण देशमुख, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रामचंद्रराव घाटगे, गणेश भोसले, प्रीतीश किलजे, रमेश हलसंगी, संतोष माने, पिंटू साठे, गोटू माने, सिद्धाराम माळी, रामचंद्र समाने, प्रदीप पाटील, शरणाप्पा कापसे, दरेश्वर उण्णद, किरण जाधव, धनंजय गडदे, केदार माळशेट्टी, अभिजित लोकापुरे, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, राजकुमार झिंगाडे, राजेश भोसले, केदार तोडकर, गोविंद शिंदे, सागर याळवर, संजय गोंडाळ, अतिश शिंदे, सागर शिंदे, अण्णा सावंत, रमेश केत, मैनुद्दीन कोरबु, शबाब शेख, दत्ता माने, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बाळासाहेब घाडगे, सिद्धेश्वर हत्तुरे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, विठ्ठल रेड्डी, सुमित कल्याणी, विराज माणिकशेट्टी, पै.महेश कुलकर्णी, पै.मौला शेख, सरफराज शेख, अतिश पवार व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.   
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास, यात्रीभुवन गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती. गेल्या ११ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता नेटके नियोजन केलेले होते. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी तर व आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले. 
  
चौकट : शेकडो भक्तांनी केले रक्तदान :
गेल्या ११ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले. 
चौकट :चोख बंदोबस्त : –
श्री गुरु पौर्णिमा व ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व पो नि महेश स्वामी  यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.
चौकट : न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्याने वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
चौकट : लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू आहे. दररोज २५ हजार हून अधिक तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व गुरुपोर्णिमेच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला. 
चौकट : श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नांव सातासमुद्रापार  :* 
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यासह विदेशातून लाखो भाविकांनी न्यासाचे ३८ वा. वर्धापनदिन व गुरुपोर्णिमेच्या निमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.  
Previous Post

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी

Next Post

श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 

श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697