Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अनंत चैतन्य प्रशालेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ”  अभियानाचा तृतीय पुरस्कार

Admin by Admin
June 30, 2025
in शैक्षणिक
0
अनंत चैतन्य प्रशालेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ”  अभियानाचा तृतीय पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता  विकसित करण्याबरोबरच आरोग्य,स्वच्छता ,पर्यावरण,
क्रीडा याविषयी जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देण्यासाठी व शाळा- शाळांमध्ये स्पर्धा निर्माण करुन या स्पर्धेच्या माध्यमातून शाळा सर्व भौतिक सुखसुविधांनी युक्त व्हाव्यात व विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिकता यावे जेणेकरून त्यांची संपादणूक क्षमता वाढावी या महत्वकांक्षी उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ” मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ” हे अनोखे  अभियान १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान  राज्य, जिल्हा व तालुका अशा तीन स्तरावर राबवले गेले. यात १०० गुणांच्या 
 मूल्यांकनाच्या आधारे शाळेची पुरस्कारासाठी निवड करण्याचे निकष ठरवले गेले.व या  शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रेरणादायी उपक्रमात महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर ने सर्व निकष डोळ्यासमोर ठेवून पुर्ण तयारी निशी आपला सहभाग नोंदवला होता व शिक्षण विभागाच्यावतीने मुल्यांकनाकरिता नेमण्यात आलेल्या तज्ञपथकांच्या परीक्षणाच्याद्वारे शाळेची सन २०२३-२४ मधील या पहिल्या टप्प्यातील तृतीय पुरस्कारासाठी निवड झाली.अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध “पुरस्कार वितरण सोहळा ” कार्यक्रमात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते मुख्याध्यापक . अशोक साखरे यांना अक्कलकोट पं. स. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी .प्रशांत अरबाळे,शिक्षण विस्तार अधिकारी.सोमशेखर स्वामी,पर्यवेक्षक .ज्ञानदेव शिंदे,जेष्ठ शिक्षक.शहाजी माने,.सुरेश जाधव,.राजेंद्र यंदे,.स्वप्नाली जमदाडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी संस्था सुविधा पुरविण्याचे काम करते मात्र दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी अधिक जोमाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करत सन्मान प्राप्त शाळांचे कौतुक केले व  या प्रेरणादायी योजनेबद्दल शासनाचे आभार मानले. 
याप्रसंगी मुख्याध्यापक .अशोक साखरे यांनी हा पुरस्कार शाळा, विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेत्तर या सर्वांकरिता अभिमानाची गोष्ट असून यामुळे उस्फूर्तपणे काम करण्याकरिता अधिक बळ प्राप्त होईल असे सांगितले.शाळेने प्राप्त केलेल्या या  
बहुमानाबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक . मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड . सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका . शांभवी कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते . सागर कल्याणशेट्टी , संचालक . मल्लिकार्जुन मसुती,सी.ई.ओ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख. पुनम कोकळगी यांनी शुभेच्छासह अभिनंदन केले.
Previous Post

अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड

Next Post

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत!

Admin

Admin

Next Post
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत!

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157007
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697